पत्थरबाजी का जवाब जरूर मिलेगा, आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगड फेकल्याने चंद्रकांत खैरे भडकले
X
आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगड फेकल्याने चंद्रकांत खैरे यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. राज्यात झालेल्या बंडानंतर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. यामध्ये सध्या शिवसंवाद यात्रा औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात आहे. या औरंगाबाद जिल्ह्यातील महालगाव या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगड फेकण्यात आला. त्यावरून माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली.
यावेळी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगड फेकण्याला पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. तसेच पोलिसांनी सहकार्य न केल्यानेच जमावातून दगड फेकण्यात आला. त्याबरोबरच आदित्य ठाकरे यांनी डीडे चालू राहू द्या, असं सांगितल्यानंतरही पोलिसांनी डीजे बंद केला. त्यामुळेच हे सगळं घडून आलं. त्यामुळे या सर्व गोष्टींचा जवाब अभी नहीं, आदित्य ठाकरे यांना जाऊ द्या. मग बघतोच आम्ही, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी इशारा दिला.
तसेच पत्थरबाजी का जवाब जरूर मिलेगा, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी चेथावणी दिली आहे.