पी चिंदबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या घरावर छापे
X
माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयने आज (सोमवारी) छापे टाकले आहेत. सीबीआयने कार्ती चिदंबरम यांच्या चेन्नई, मुंबई, ओडिशा आणि दिल्ली येथील घर आणि कार्यालयांवर छापे टाकले. यादरम्यान कार्ती चिदंबरम काही सहयोगींच्या संपत्तीवर छापे पडल्याचं बोललं जात आहे.
काय आहे प्रकरण?
कार्ती चिदंबरम यांच्यावर 250 चीनी लोकांना व्हिसा देण्याच्या बदल्यात 50 लाख रूपयाची लाच घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने कार्ती चिदंबरम यांच्यावर या संदर्भात नवीन गुन्हा दाखल केला असून कार्ती चिदंबरम यांनी 2010 ते 2014 दरम्यान 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला आहे.
सीबीआयच्या छापेमारीनंतर कार्ती चिदंबरम यांनी ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी " हे किती वेळा होत आहे.मी विसरलो आहे. एक रेकाॅर्ड व्हायला हवं"
I have lost count, how many times has it been? Must be a record.
— Karti P Chidambaram (@KartiPC) May 17, 2022
चिदंबरम आणि आयएनएक्स मीडिया प्रकरण नक्की काय आहे?
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने 15 मे 2017 रोजी आयएनएक्स मीडिया या मीडिया कंपनीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. 305 कोटी रुपयांचा निधी मिळविण्यासाठी फॉरेन इनवेस्टमेंट प्रमोशन बोर्ड (एफआईपीबी) (FIPB) मंजुरी देताना अनियमितता केल्याचा आरोप मीडिया समूहावर करण्यात आला आहे. 2007 मध्ये जेव्हा कंपनीला गुंतवणुकीसाठी मान्यता देण्यात आली तेव्हा पी चिदंबरम हे अर्थमंत्री होते.
2019 मध्ये, पी. चिदंबरम यांना INX मीडिया प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना अनेक दिवस तिहार तुरुंगात राहावे लागले होते. या प्रकरणी सीबीआयने चिदंबरम, कार्ती चिदंबरम आणि इंद्राणी मुखर्जी यांच्यासह १४ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.