मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अमित शाह - नड्डा यांच्यात ४ तास बैठक, काय घडलं बैठकीत ?
X
राज्यात महिना झाला तरी मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि अमित शहा यांची उभय नेत्यांनी भेट घेतली. सुमारे ४ तास चाललेल्या बैठकीत मंत्रीमंडळ विस्ताराबाबत फायनल चर्चा झाली.
एकनाथ शिंदे यांनी जागा वाटपाचा फॉर्मुल्यात ५० टक्के जागांची मागणी केली होती. मात्र, भाजपला ६० ते ६५ टक्के जागा तर शिंदे यांच्या गटाला ३५ ते ४० टक्के जागा देण्यात आल्या आहेत. भाजपने मलाईदार खाती स्वतःकडे ठेवल्याने शिंदे गट नाराज आहे.
२०१४ च्या सत्तावाटपानंतर शिवसेना सातत्याने नाराज होती. त्या प्रमाणे शिंदे गटाचंही याही सरकारमधेय्ये होण्याची शक्यता आहे. मात्र, इडी आणि सीबीआयचा गेल्या अडीच वर्षाचा अनुभव पाहाता शिंदे गटाची अवस्था भीक नको पण कुत्रा आवर अशी होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयातील केस संदर्भात काय?
रात्री झालेल्या या बैठकीत सरकारची बाजू कशी असेल? यावरही विधीज्ञांशी चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीनंतर २-३ दिवसात मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केलाय.
दरम्यान मुख्यमंत्री शनिवारी रात्री साडेनऊला दिल्लीत दाखल झाले. तर उपमुख्यमंत्री त्याअगोदरच संध्याकाळी साडेसहा वाजता दिल्लीत दाखल झाले होते.