Home > Politics > Pankaja Munde यांचा उद्धव ठाकरेंना फोन...

Pankaja Munde यांचा उद्धव ठाकरेंना फोन...

Pankaja Munde यांचा उद्धव ठाकरेंना फोन...
X

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल केल्यानंतर राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले. मात्र वादळानंतर उद्धव ठाकरे यांना भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी फोन केला. मात्र फोनवर दोघांमध्ये काय चर्चा झाली, हे सांगण्यास मुंडे यांनी नकार दिला.

उद्धव ठाकरे यांचे ४० आमदार आणि त्यानंतर पक्षाचे नावासह चिन्ह गेल्याने उद्धव ठाकरे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. एकीकडे भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका करत असताना मात्र दुसरीकडे भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांनी फोन कपुन सांत्वना देण्याचे काम केले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपले काय बोलणे झाले हे सांगणार नसल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे. मात्र या फोनची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सध्या सुरु आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा काळ सर्वाधिक कठीण काळ असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. एक कार्यकर्ता हा आपल्या दिवंगत नेत्याचा वारसा कसा होवू शकतो किंवा तो कसा असू शकतो याचे मुर्तीमंद उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे हे असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे. सत्तेत असल्यामुळे शिंदे यांना आपल्यासोबत असलेल्या सर्व आमदार, खासदारांना निवडून आणणे फार जिकरीचे असणार आहे. तर दुसरीकडे पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्हीही नसताना आपला पक्ष मोठा करणे, हे आव्हान ठाकरे यांच्यासमोर असणार असल्याचे मत. पंकजा मुंडे यांनी मांडले आहे.

पंकजा मुंडे यांनी राज्याच्या राजकारणावर यावेळी बोलणे टाळले असले तरी यावर त्या वेळ आल्यावर बोलतील, अशी आशा सर्वांना आहे. सध्या पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराचा सपाटा सुरु आहे. चिंचवडमधील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे पुण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांना आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याचे सूचक वक्तव्य केले.

Updated : 20 Feb 2023 7:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top