म्याव म्याव संपल्यानंतर वस्त्रहरण, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना इशारा
X
आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्य़ात ठिकठिकाणी एकनाथ शिंदे (cm eknath shinde ) यांच्यासह बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांना भाजपचे आमदारा नितेश राणे (Nitesh rane) यांनी इशारा दिला आहे. नितेश राणे यांनी शनिवारी सकाळी ट्विट करत एक गंभीर आरोप केला आहे.
ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुपारी देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सुपारी दिली होती, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. एवढेच नाही तर आदित्य ठाकरे यांचा दौरा आटोपल्यानंतर आपण एक गौप्यस्फोट करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना विश्वासघात केला असा आरोप आदित्य ठाकरे करत आहे. त्या आरोपाला उत्तर देतांना नीतेश राणे यांनी महाराष्ट्रात कोरोनामुळे लोक मरत असताना आदित्य ठाकरे अभिनेता दिनो मौर्याच्या घरी संध्याकाळी सात नंतर काय करत असायचे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.