Home > Politics > "आपल्या घराला आग आणि दुसऱ्या गावातील धुरावर बोंबा", पडळकर यांची टीका

"आपल्या घराला आग आणि दुसऱ्या गावातील धुरावर बोंबा", पडळकर यांची टीका

आपल्या घराला आग आणि दुसऱ्या गावातील धुरावर बोंबा, पडळकर यांची टीका
X

सांगली : महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद म्हणजे आपल्या घराला आग लागली असताना दुसऱ्या गावातील धुरावर बोंबा मारण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

"लखीमपुरच्या शेतकऱ्यांबद्दल आम्हाला संपूर्ण सहानूभूती आणि सहवेदना आहे, आमचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी क्षमतापूर्ण आहेत, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच कठोर निर्णयही घेतील. पण जनाब राऊत तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला. तो ओल्या दुष्काळामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे. शेतकऱ्याचा साताबारा कोरा करू म्हणणारे अजूनपर्यंत त्याला मदत द्यायला बांधावरती पोहचले नाही. अजूनही शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबूगिरीतच अडकवलेलं आहे. तुमचा हा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे आपल्या घरात आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखे आहे." अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

Updated : 11 Oct 2021 12:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top