'ब्राह्मण-बनिया माझ्या खिशात आहेत', भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, कॉंग्रेसची माफी मागण्याची मागणी
X
भाजप आता दलित, ओबीसी वर्गात आपली पकड मजबूत करत आहे. मात्र, अजूनही भाजपचे वरिष्ठ नेते भाजपला ब्राह्मण आणि बनिया लोकांचा पक्ष मानतात. भाजपचे सरचिटणीस पी. मुरलीधर राव यांनी ब्राह्मण आणि बनिया आपल्या खिशात असल्याचे वक्तव्य केलं आहे.
राव यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण पेटले आहे. राव यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.nमुरलीधर राव हे मध्य प्रदेश भाजपचे प्रभारी आहेत. ते सोमवारी भोपाळमध्ये पत्रकारांशी बोलत होते. या दरम्यान राव यांनी हे वक्तव्य केले.
ते म्हणाले, "जेव्हा भाजपची सुरुवात झाली, त्यावेळी पक्षात एका विशिष्ट वर्गाचे लोक जास्त होते. पण आपल्याला सर्व स्तरातील लोकांचा पक्ष बनवायचा आहे.
यावर मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ म्हणाले, भाजप 'सबका साथ, सबका विकासची घोषणा देतो' आणि त्याचे सरचिटणीस म्हणतात की ब्राह्मण आणि बनिया आपल्या खिशात आहेत. भाजप सरचिटणीसांचे हे वक्तव्य या वर्गांचा अपमान आहे. सत्तेमुळे भाजप नेते अहंकारी झाले आहे. त्यांनी या दोनही समाजाची माफी मागावी, अशी मागणी कमलनाथ यांनी केली आहे
गेल्या काही महिन्यांत भाजपने ओबीसी वर्गासाठी मोठी पावले उचलली आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणूकांवर नजर ठेवून भाजप ने ओबीसी वर्गावर लक्ष केंद्रित केलं आहे. योगी मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपने दलित आणि ओबीसी जातींना महत्त्वाचे स्थान दिले होते.