Home > Politics > "हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना?" अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर राम कदम यांचा घणाघात

"हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना?" अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर राम कदम यांचा घणाघात

हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना? अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर राम कदम यांचा घणाघात
X

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर ईडीने अटक केली आहे. 100 कोटी रुपयांचे कथित वसुली आदेश दिल्याच्या प्रकरणात ED ने देशमुखांना काल अटक केली. त्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट करून हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना? असा सवाल केला आहे.

"पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीमध्ये त्यांचे प्रमुख बॉस कोण आहेत? वसुलीचे हिस्सेदार, वाटेकरी, कोण कोण नेते आणि पक्ष आहेत, हे समोर येईल. अन अर्थातच त्या बड्या नेत्यांनाही जेलमध्ये जावे लागेलच. ही लढाई कोणा एका व्यक्ति विशेषच्या विरोधातील नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. कल्पना करा. महिन्याला एका खात्यात फक्त मुंबईतून 100 कोटी तर संपूर्ण महाराष्ट्रात किती? अन सर्व खाती मोजली तर किती कोटी? हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना?" असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे.

Updated : 2 Nov 2021 9:11 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top