'तेंव्हा' शरद पवार यांनी संयम बाळगला होता- आशिष शेलार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एका व्यक्तिने कानशिलात लगावली होती. तेव्हा त्यांनी संयम बाळगला, पवारांसारख्या संयमी माणसासोबत राहुन शिवसेनेला हे कळले नाही? असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली.
X
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एका व्यक्तिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एका व्यक्तिने
कानशिलात लगावली होती. तेव्हा त्यांनी संयम बाळगला,
पवारांसारख्या संयमी माणसासोबत राहुन शिवसेनेला हे कळले नाही? असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली.कानशिलात लगावली होती. तेव्हा त्यांनी संयम बाळगला, विशेष म्हणजे पवारांनी त्या व्यक्तिला माफ देखील केले. पवारांसारख्या संयमी माणसासोबत राहुन शिवसेनेला हे कळले नाही? असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपने आक्रमक होत शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्याची बहुदा राज्यातील पहिलीच घटना असून, ही अटक राजकीय सूडबुद्धीने केलेली होती अशी प्रतिक्रिया अनेक भाजप नेत्यांनी दिली आहे. दरम्यान याबाबत शेलार यांनी देखील पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर निशाणा साधला, यावेळी त्यांनी थेट पवारांसोबत घडलेल्या घटनेचे उदाहरण दिले.संयमी माणसासोबत राहून देखील शिवसेनेला ते कळत नाही, अशी टीका शेलार यांनी केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळीही उद्धव ठाकरे यांनी षडयंत्र केलं, सुरेश प्रभूंना केंद्रात मंत्रिपद मिळालं, त्यावेळी ठाकरेंनी तेच केलं, अस म्हणत आता कोकणातील नेत्याला केंद्रात मोठं पद मिळालं म्हणून ठाकरेंच्या पोटात दुखत आहे, अशी खरमरीत टीका शेलार यांनी केली.