महाराणा प्रताप यांच्या इतिहासाबद्दल भाजप पदाधिकाऱ्याचे अज्ञान, सोशल मीडियावर ट्रोल..
X
सध्या सोशल मीडियावर इतिहासातील मुस्लिम राज्यकर्ते आणि हिंदू राज्यकर्ते यांच्याबद्दलचे काही मेसेज व्हायरल होत आहेत. असाच एक मेसेज हरयाणा भाजपचे IT सेल प्रमुख अरुण यादव यांनी ट्विट केला आहे. मुस्लिम राज्यकर्त्यांचा इतिहास शिकवला गेला पण महाराणा प्रताप यांचा इतिहास शिकवला गेला नाही, अशा आशयाचे हे ट्विट होते. पण हे ट्विट करताना अरुण यादव यांनी आपले अज्ञानच दाखवले अशा प्रतिक्रिया अनेकांनी त्यांच्या ट्विटवर केल्या आहेत. यादव यांनी काय ट्विट केले होते ते पाहा...
"बाबर का बेटा हुमायूं, हुमायूं का बेटा अकबर, अकबर का बेटा जंहागीर, लेकिन महाराणा प्रताप के पिता का नाम हमे नही पता, सोचो हमें क्या पढाया गया और क्या छुपाया गया"
"आपला इतिहासही माहित नाही, इतिहासाच्या क्लासला बंक करून पिक्चर पाहायला जात होते का? संघात इतिहास शिकवत नाही काय?" असा सवाल एका नेटकऱ्याने विचारला आहे.