Home > Politics > भाजप-शिंदे गटाकडून जळगावमधे महाविकास आघाडीचा केला करेक्ट कार्यक्रम

भाजप-शिंदे गटाकडून जळगावमधे महाविकास आघाडीचा केला करेक्ट कार्यक्रम

राष्ट्रवादीचे एकनाथ खडसेंनी (Eknath Shinde) जिल्हा बँकेच्या चेअरमन पदासाठी दिलेल्या उमेदवाराचा राष्ट्रवादीच्याच संचालकाने बंडखोरी करून भाजप-शिंदे गटाच्या मदतीने महाविकास आघाडीची (MVA) सत्ता उलथून लावली आहे. खडसेंनी दिलेला उमेदवार नको यासाठी भाजप शिंदे गट राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन खडसेंना मोठा धक्का दिला आहे.

भाजप-शिंदे गटाकडून जळगावमधे महाविकास आघाडीचा केला करेक्ट कार्यक्रम
X

बंडखोरी करत अजित पवारांचे (Ajit Pawar) कट्टर समर्थक असलेले राष्ट्रवादीचे संजय पवार (Sanjay Pawar) यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील (Ravindra Bhaiya Patil) यांचा पराभव केला हे विशेष आहे. जळगाव (Jalgaon) जिल्हा सहकारी बँकेत राष्ट्रवादीची सत्ता गेल्या वर्षभरापासून होती एक वर्ष झाल्यानंतर नवीन चेअरमन निवडणुकीसाठी आज गुप्त मतदान झालं.

जिल्हा बॅकेत अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रविंद्र भैय्या पाटील यांचे नाव निश्चित झाले असतांनाही राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी ऐनवेळी बंडखोरी करत आयत्यावेळी शिंदे गटाच्या मदतीने अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. अखेर या निवडणुकीत झालेल्या गुप्त मतदानात 21 पैकी संजय पवार यांना ११ मते पडल्याने अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळयात पडली आहे. संजय पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) पक्षासह महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षा कडून जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांचं नाव निश्चित करण्यात आल्याच्या घोषणे नंतर राष्ट्रवादी पक्षाच्याच संजय पवार यांनी ही शिंदे गटाची मदत घेत आपला उमेदवारी अर्ज भरल्याने जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती, राष्ट्रवादी पक्षातच बंडखोरी झाल्याने गुप्त मतदान घेण्यात येत आले. यात २१ पैकी ११ मतदान हे संजय पवार यांना तर १० मतदान हे रविंद्र भैय्या पाटील यांना पडले. त्यामुळे चुरशीच्या झालेल्या या लढतीत एका मताने संजय पवार यांचा विजय झाला. उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे परोळ्याचे आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांचे चिरंजीव अमोल पाटील (Amol Patil) यांची निवड झाली आहे.

आमच्यात गद्दारी झाली- एकनाथ खडसे

या सर्व प्रकारावर बोलतांना एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) म्हटलं आहे की, सर्वांना एकत्र ठेवण्यात आम्हाला अपयश मिळालं, काँग्रेसची मत फुटली, आमच्यातच गद्दारी झाली व आमचा नाईलाज झाला असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे, शिवसेनेचे व काँग्रेसचे मत फुटली, महाविकास आघाडीतील लोकांकडून आम्हाला अपेक्षा नव्हती त्यांनी विश्वासघात केला, त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला धोका पोहचला, अमच्यातच गद्दारी झाली अशी प्रतिक्रिया असे खडसेंनी दिली

आम्हाला अदृश्य हातांनी मदत केली - गुलाबराव पाटील

राष्ट्रवादीने योग्य उमेदवार दिला नाही.सर्वांच्या मताने संजय पवार ह्याचासाठी आग्रह होता पण खडसेंचा वेगळाच आग्रह होता दिलेल्या उमेदवाराच रेकॉर्ड पाहिलं नाही आम्ही योग्य उमेदवार दिला सर्वांनी मदत केली आमची फक्त सहा मत होती, पण आम्हाला अदृश्य हातांनी मदत केली

सहकारात पक्ष नसतो - संजय पवार - चेअरमन जळगाव जिल्हा सहकारी बँक

अजित पवार हे माझे नेते आहे, सहकारात पक्ष नसतो, मात्र या निवडणुकीत मला भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), मंत्री गुलाबराव पाटील, व शिंदे गटाचे व भाजपचे आमदार या सर्वांनी मला न्याय दिला, खऱ्या अर्थाने जिल्हा बॅकेत मला २० वर्षांनतर न्याय मिळाला आहे, मी समाधान असल्याचं नवनियुक्त्त अध्यक्ष संजय पवार यांनी म्हटलं आहे.

Updated : 12 March 2023 6:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top