भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, जोरदार धक्काबुक्की
टीम मॅक्स महाराष्ट्र | 1 Jan 2022 4:47 PM IST
X
X
भाजप अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या अंगावर काळे टाकण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आल्याच्या संशयावरुन दोन्ही पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांचा वाद झाला आहे. पंढरपूरमध्ये ही घटना घडली. भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी या कार्यकर्त्यांना अडवले, त्यावेळी जोरदार वादावादी झाली. आचार्य तुषार भोसले यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश सचिव आणि भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यात धक्काबुक्की देखील झाली.
Updated : 1 Jan 2022 4:47 PM IST
Tags: SharadPawar Congress bjp
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire