Home > Politics > दलित समूहासाठी के. सी राव यांची मोठी घोषणा

दलित समूहासाठी के. सी राव यांची मोठी घोषणा

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी आपल्या बीआरएस पक्षाच्या विस्तारासाठी नांदेडमध्ये पहिली जाहीर सभा घेतलीय. या सभेत त्यांनी दलित समूहासाठी मोठी घोषणा केली आहे. काय आहे ही घोषणा पहा या व्हिडीओमध्ये….

दलित समूहासाठी के. सी राव यांची मोठी घोषणा
X

तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांनी यांनी आपल्या तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असं केलं आहे. त्यानंतर आपल्या पक्षाच्या विस्ताराला महाराष्ट्रातील नांदेड येथून सुरुवात केली आहे. यामध्ये केसीआर यांनी नांदेडमध्ये भव्य सभा घेतली. या सभेच्या माध्यमातून दलित समुदायासाठी केसीआर यांनी मोठी घोषणा केली.

यावेळी केसीआर म्हणाले, तेलंगणात दलित बंधू योजनेंतर्गत दलितांना उद्योगासाठी 10 लाख रुपये अनुदान दिले जाते. मात्र बीआरएस पार्टी देशात सत्तेत आली तर देशभर दलितांना 25 लाख रुपये उद्योग सुरु करण्यासाठी अनुदान दिले जाईल, अशी घोषणा यावेळी के. सी राव यांनी केली.

यावेळी केसीआर यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही केसीआर यांनी सरकारला घेरले.


केसीआर यांनी मराठवाड्यातील दुष्काळ संवण्यासाठीचा उपाय सूचवला आहे.

Updated : 6 Feb 2023 12:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top