खडसे परिवाराच्या अडचणी वाढल्या; एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना ईडीची नोटीस
X
एकेकाळी भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले आणि सध्या राष्ट्रवादीचे नेते असलेले एकनाथ खडसे परिवाराच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. सुरुवातीला जावयाला अटक केली, लगेच खडसे यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं. आणि आता पत्नी मंदाताई खडसे यांनाही ईडी ने चौकशी ला हजर राहण्याचं समन्स दिलं आहे.
भोसरी MIDC च्या वादग्रस्त भूखंड प्रकरणी सक्तवसुली संचनालय (ED) ने एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केल्यानंतर काल खडसे यांची नऊ तास चौकशी करण्यात आली. खडसे यांना अटक होऊ शकते. अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. खडसे यांची रात्री उशिरा चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. चौकशीला पूर्ण सहकार्य करू तसंच जेव्हा चौकशीसाठी बोलावलं जाईल. त्यावेळी एकनाथ खडसे हजर राहतील असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण?
भोसरी येथील वादग्रस्त MIDC भूखंड एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना पत्नी मंदाताई खडसे आणि जावई गिरीश दयाराम चौधरी यांनी संयुक्तिक रित्या भूखंड खरेदी केला होता. भूखंड खरेदी करतांना पैश्यांचा व्यवहार हा संशयास्पद असल्याचं ईडीला वाटतंय. यात जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर ईडीच्या कार्यवाइची टांगती तलवार खडसे दाम्पत्यावर आहे. असं अगोदरच मानलं जातं होत. खडसे परिवाराच्या एका पाठोपाठ ईडीने समन्स बजावलं आहे.
मंदाताई खडसे यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मंदाताई खडसे यांनी 14 दिवसांची ईडी कडून मुदत मागितली आहे. मंदाताईंना 14 दिवसानंतर ईडी च्या कार्यालयात हजर राहावं लागणार आहे .
भोसरी भूखंडात जावई गिरीश चौधरी आणि मंदाताई खडसे यांच्याच नावाचा व्यवहार झाला असल्याने अटक ही होऊ शकते. अशी चर्चा आता सुरू आहे. मंदाताई खडसे ह्या एकनाथ खडसे यांच्या पत्नी आहेत. त्या सध्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमन आहेत. तसंच त्या माजी महानंदा च्या माजी चेअरमन ही होत्या.