Home > Politics > नारायण राणे यांना कोंबडीचोर म्हणत भास्कर जाधव यांनी काढलं माप

नारायण राणे यांना कोंबडीचोर म्हणत भास्कर जाधव यांनी काढलं माप

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांचं चांगलंच माप काढलं.

नारायण राणे यांना कोंबडीचोर म्हणत भास्कर जाधव यांनी काढलं माप
X

शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच दोन दसरा मेळावे झाले. त्यापैकी एक दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे तर दुसरा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर झाला. यावेळी भास्कर जाधव यांनी शिंदे गटासह केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, हा खुद्दारांचा तर तो गद्दारांचा मेळावा आहे. तसेच भास्कर जाधव यांनी बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याचा उल्लेख कचरा मेळावा असा केला.

पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले, नारायण राणे म्हणतात मी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना संपली. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर उध्दव ठाकरे संपले, अशा शब्दात राणेंची नक्कल केली. तसेच नारायण राणे यांना मेलास तु तुला दोन वेळा पाडलं, तुझ्या पोराला दोन वेळा पाडलं आणि शिवसेना संपली असं म्हणतो कोंबडी चोर अशा शब्दात भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला.

नारायण राणे सातत्याने उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत होते. त्यापार्श्वभुमीवर नारायण राणे यांच्यावर भास्कर जाधव यांनी टीका करताना मोठं माप काढलं.

Updated : 6 Oct 2022 12:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top