Home > Politics > Bharat Jodo Yatra : बाळासाहेब थोरात यांनी टोचले मीडियाचे कान

Bharat Jodo Yatra : बाळासाहेब थोरात यांनी टोचले मीडियाचे कान

Bharat Jodo Yatra : बाळासाहेब थोरात यांनी टोचले मीडियाचे कान
X

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेचा महाराष्ट्रातील पाचवा दिवस आहे. यानिमीत्ताने हिंगोली येथे बाळासाहेब थोरात यांनी भारत जोडो यात्रेची भूमिका मांडली.

राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी सुरु केलेली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra)महाराष्ट्रातील हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात दाखल झाली आहे. या निमीत्ताने बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भारत जोडो यात्रेची भूमिका मांडली. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोक उत्साहाने मोठ्या प्रमाणात भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. कारण या लोकांना देशाची राज्यघटना आणि लोकशाही वाचावी, असं वाटत आहे. त्याबरोबरच देशात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचा मालाला भाव न मिळणे, जाती-पातीत भेद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे याविरोधात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु केली आहे.

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, ज्या लोकांना लोकशाही आणि संविधान वाचलं पाहिजे. ते सर्व लोक या यात्रेत चालत आहेत. त्यामुळे जशी या लोकशाही वाचवण्याची जबाबदारी या सर्वसामान्यांची आहे. त्याप्रमाणेच लोकशाही वाचवण्याची जबाबदारी मीडियाचीही आहे. त्यामुळे मीडियाने भारत जोडो यात्रेला कव्हरेज द्यायला हवे, असं मत व्यक्त करत बाळासाहेब थोरात यांनी मीडियाचे कान टोचले.

Updated : 12 Nov 2022 4:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top