Home > Politics > ममता बॅनर्जी यांचं भवितव्य आज होणार मतदान पेटीत कैद, भवानीपूर मध्ये आज मतदान

ममता बॅनर्जी यांचं भवितव्य आज होणार मतदान पेटीत कैद, भवानीपूर मध्ये आज मतदान

ममता बॅनर्जी यांचं भवितव्य आज होणार मतदान पेटीत कैद, भवानीपूर मध्ये आज मतदान
X

पश्चिम बंगालच्या भवानीपूर मतदारसंघात आज गुरुवारी सकाळी ९ वाजल्यापासून (३० जून) मतदानाला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमधील भवानीपूर व्यतिरिक्त, समसेरगंज आणि जंगीपूर मध्येही आज मतदान होत आहे. आज संध्याकाळी 6.30 पर्यंत मतदान सुरु राहणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत 35.97% मतदान पार पडलं आहे.

दरम्यान, भवानीपूरच्या मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असुन तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या भवितव्यावर आज तीन लाखांहून अधिक मतदार निर्णय घेणार आहेत. 3 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. ममता बॅनर्जींसाठी ही पोटनिवडणूक अत्यंत महत्त्वाची असून ममता बॅनर्जी विधानसभेच्या सदस्य नाहीत. त्या नंदीग्राममधून निवडणूक हरल्या होत्या. त्यामुळं त्यांना ही निवडणूक जिंकणं गरजेचं आहे.

कोणत्याही व्यक्तीने शपथ घेतल्यानंतर सहा महिन्याच्या आत विधीमंडळाचं सदस्य होणं गरजेचं असतं. मात्र, विधानसभेच्या सदस्य नसतांनाही त्या मुख्यमंत्री होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तर त्यांचा सहा महिन्यांचा कालावधी 3 नोव्हेंबर ला पूर्ण होईल. मात्र, तोपर्यंत जर त्या विधानसभेच्या सदस्या झाल्या नाहीत तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

मात्र, नियमानुसार राजीनामा दिल्यानंतरही पुन्हा सहा महिन्यांसाठी त्या मुख्यमंत्री बनू शकतात. परंतु यामुळे त्यांची मोठी बदनामी होईल. ममता बॅनर्जी यांना हे आवडणार नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे शोभनदेव चट्टोपाध्याय कोलकात्यातील भवानीपूर मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी त्या जागेचा राजीनामा दिला होता. जेणेकरून ती जागा रिक्त होईल आणि ममता बॅनर्जी तेथे होणाऱ्या पोटनिवडणुकीत निवडणूक लढवू शकतील.

दरम्यान, भवानीपूर मतदार संघ हा तृणमूल कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. 2021 च्या पश्चिम बंगालच्य़ा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस या पक्षाला घवघवीत यश मिळालं होतं. मात्र, ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम मधून पराभवाला सामारे जावं लागलं होतं.

प्रियंका टिबरीवाल शी होणार सामना...

ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचा खटला लढणाऱ्या वकील प्रियंका टिबरीवाल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. ममता सरकारविरोधात उच्च न्यायालयात वकिली केल्यामुळे टिबरीवाल या अगोदरही चर्चेत राहिल्या आहेत.

कोण आहेत प्रियंका टिबरीवाल?

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने ममता बॅनर्जींसमोर प्रियंका टिबरीवाल यांना उमेदवारी दिली आहे. त्या वकील आहेत. ममतांना आव्हान देणाऱ्या प्रियंका टिबरीवाल यांना राजकारणाचा फारसा अनुभव नाही. मात्र, त्यांनी पक्षात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. 2014 मध्ये मोदी लाटेत प्रियंका यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2015 च्या महापालिका निवडणुकीत त्यांना पक्षाने तिकीट दिले होते.

प्रियंका यांनी कोलकाता नगरपरिषदेची निवडणूक प्रभाग 58 (एंटली) मधून लढवली होती. पण त्यांना टीएमसी उमेदवार स्वप्ना समदार यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. प्रियंका टिबरीवाल यांनी गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत एंटलीमधून उमेदवारी दिली होती. पण या निवडणुकांमध्येही ती पराभूत झाली. त्यांना टीएमसीचे उमेदवार स्वर्ण कमल साहा यांनी 58 हजार 257 मतांनी पराभूत केले होते. आता पुन्हा एकदा प्रियांका मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळं प्रियंका ममता बॅनर्जी यांच्यासमोर कसं आव्हान उभं करतात. हे पाहणं महत्त्वाचं आहे.

ममता बॅनर्जी यांचे जुने सहकारी सुवेंदु अधिकारी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान देण्यासाठी ममता यांनी त्यांचा परंपरागत भवानीपूर मतदारसंघ सोडून नंदीग्राम येथून निवडणूक लढविली होती. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भवानीपूर येथून विजयी झालेले तृणमूलचे आमदार शोभन देव चट्टोपाध्याय यांनी बंगाल विधानसभेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. या ठिकाणावरून आता ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत

Updated : 30 Sept 2021 2:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top