संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचे विधानसभेत पडसाद
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली. त्याचे पडसाद विधानसभेत उमटल्याचे पहायला मिळाले.
X
Sandeep Deshpande attack : राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे निकटवर्तीय आणि मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉकला गेले असताना हल्ला झाल्याची घटना घडली. याचे पडसाद विधानसभेत उमटल्याचे पहायला मिळाले. शिवसेना आमदार सदा सरवणकर (Shivsena MLA Sada Sarvankar) यांनी विधानसभेत point of information च्या माध्यमातून सभागृहाला संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती दिली. यामध्ये सरवणकर म्हणाले, संदीप देशपांडे यांनी अनेकदा महापालिकेतील भ्रष्टाचाराचे (BMC Corruption) मुद्दे उपस्थित केले होते. त्यापार्श्वभूमीवर त्यांच्यावर दादरच्या (Dadar) शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉकला गेले असताना झालेला हल्ला हा निषेधार्ह आहे. त्याचा मी निषेध करतो, असं म्हणत या हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी सदा सरवणकर यांनी केली. संदीप देशपांडे म्हणाले, मी घाबरणार नाही... (Sandeep deshpande comment on Attack) संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संदीप देशपांडे म्हणाले, माझ्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. मात्र अशा हल्ल्यांना मी घाबरणार नाही. त्यांना वाटत असेल की, हल्ला केल्यानंतर मी घाबरून घरात बसेल पण मी लढत राहणार, असं मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले.