Home > Politics > आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला, फेसबुक पोस्टमधून दिली माहिती

आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला, फेसबुक पोस्टमधून दिली माहिती

विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला, फेसबुक पोस्टमधून दिली माहिती
X

दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासंदर्भात प्रज्ञा सातव यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

प्रज्ञा सातव यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, मी कळमनुरी दौऱ्यावर असताना एका ठिकाणी अचानक एक व्यक्ती गाडीमागे धावला. मात्र त्यावेळी आम्ही पटकन गाडीत बसून दरवाजे बंद केले. यानंतर पुढे मी नियोजित कार्यक्रमाला गेले. त्यावेळी भाषण सुरु असताना त्या व्यक्तीने मागून ओढले. यावेळी उपस्थितांनी त्याला मागे ओढून पोलिसांच्या ताब्यात दिले. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

प्रज्ञा सातव यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, आज कसबे धवंडा गावात माझ्यावर अमानुष हल्ला झाला. एका व्यक्तीने माझ्यावर मागच्या बाजून हल्ला केला. माझ्यावर हल्ला करून मला जखमी करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे माझ्या जीवाला धोका आहे. लोकप्रतिनिधीवर अशा प्रकारे भ्याड हल्ला होणे चिंतेची बाब असल्याचे प्रज्ञा सातव यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी त्या व्यक्तीला बाजूला ओढून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र अर्थसंकल्पिय अधिवेशनापुर्वीच प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

प्रज्ञा सातव यांनी फेसबुक पोस्ट लिहून म्हटले आहे की, आज मी कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा या गावाच्या दौऱ्यावर अस्ताना माझ्यावर एका अज्ञात व्यक्तीने मागून हल्ला केला. आज माझे पती राजीव भाऊ नाहीत आणि माझी मुले लहान आहेत. मी कोणाचेही वाईट केले नाही. महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहीन कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई , इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता.

Updated : 8 Feb 2023 11:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top