विधानसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना
टीम मॅक्स महाराष्ट्र | 3 July 2022 4:27 PM IST
X
X
एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आता विधिमंडळात सुरू झाला आहे. १६ बंडखोर आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगारला म्हणून त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. तर दुसरीकडे दोन तृतीयांश बहुमत आपल्याकडे असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे गटानेच आता शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या लेटर हेडवर विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. पक्षाचा व्हीप झुगारला म्हणून शिवसेनेच्या १६ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यामध्ये केली आहे.
विधानसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना https://t.co/im6S5nIKI9
— Max Maharashtra (@MaxMaharashtra) July 3, 2022
Updated : 3 July 2022 4:27 PM IST
Tags: Eknath Shinde Maharashtra assembly Maharashtra Political Crisis BJP Rahul Narvekar India aditya thackeray shiv sena udhav Thackery
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire