विधानसभेत 'मातोश्री ते सुरत' रस्ता सुरक्षेची चर्चा
X
रात्री आमदार पळून जाणारे मुंबई ते सुरत रस्त्यांची गुणवत्ता तपासा.. असा टोला युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना मारताच शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं.शिल्लक सेनेच्या लोकांना मुंबई सुरत रस्त्याचा वापर करता येऊ नये याची दक्षता आदित्य ठाकरेंनी घ्यायला हवी असे शंभूराज देसाई यांचे प्रत्युत्तर दिलं.
आदित्य ठाकरे यांच्या टोमण्यामुळे संतापलेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी प्रचंड गदारोळ केला त्याला वर मातोश्री चे रस्ते कसे होते ते सांगू का? गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर आले.
सुरत गुवाहाटीमुळे तुमचा विषय आता संपला आहे असेही गुलाबराव पाटील यांना सांगितले त्यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आक्षेप घेत युवा आमदाराला अशा पद्धतीने टार्गेट करणे बरं नाही त्याला बोलू द्या असे सांगून विषय संपवला... पहा विधानसभेतील या सगळ्या जुगलबंदीचा खास व्हिडिओ..