Home > Politics > हे भाजपचे संस्कार आहेत का? राहुल गांधींवरच्या वादग्रस्त वक्तव्यावरून चंद्रशेखर राव यांचा पंतप्रधानांना सवाल

हे भाजपचे संस्कार आहेत का? राहुल गांधींवरच्या वादग्रस्त वक्तव्यावरून चंद्रशेखर राव यांचा पंतप्रधानांना सवाल

हे भाजपचे संस्कार आहेत का? राहुल गांधींवरच्या वादग्रस्त वक्तव्यावरून चंद्रशेखर राव यांचा पंतप्रधानांना सवाल
X

मुंबई : देशात पाच राज्यांच्या निवडणूकीदरम्यान राजकीय वातावरण तापले होते. त्यातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. दरम्यान उत्तराखंड येथील सभेत बोलताना आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरून संतप्त होत हे भाजपचे संस्कार आहेत का? असा सवाल तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केले. ते हैद्राबादमधील रायगीरी येथील सभेत बोलत होते.

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी राहुल गांधी हे राजीव गांधींचेच पुत्र आहेत का? असा सवाल केला होता. त्यावर काँग्रेसकडून तीव्र आक्षेप व्यक्त केला जात आहे. त्यातच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी संतप्त होत हे भाजपचे संस्कार आहेत का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. तर हेमंत बिस्व सरमा यांना मुख्यमंत्री पदावरून बडतर्फ करा, अशी मागणी केली आहे.

पुढे बोलताना चंद्रशेखर राव म्हणाले की, आसामचे मुख्यमंत्री एका नेत्याला तुमचे वडील कोण आहेत? असा प्रश्न विचारत आहेत. हे भाजपचे संस्कार आहेत का? हा आपला हिंदू धर्म आहे का? ही आपल्या देशाची संस्कृती आहे का? असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारले. तर भाजपचे मुख्यमंत्री असलेल्या सरमा यांनी राहुल गांधी यांना तुमचे वडील कोण असे विचारल्याचे वक्तव्य ऐकल्यावर माझ्या डोळ्यातच पाणी आले. माझी मान शरमेने खाली झुकली, पण ही बाब देशासाठी चांगली नसल्याचे मत चंद्रशेखर राव यांनी केले.

हिंदु धर्माच्या नावावर मत मिळवणारे तुम्ही वाईट लोक आहात. मी भाजपाध्यक्ष जे. पी . नड्डांना विचारेन की हे भाजपचे संस्कार आहेत का? तसेच तुम्ही ईमानदार असाल आणि धर्म मानणारे असाल तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांना बडतर्फ करा, अशी मागणी चंद्रशेखर राव यांनी केली.

उत्तराखंड येथील सभेत बोलताना आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा म्हणाले की, भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले. मात्र त्याचे राहूल गांधी यांनी पुरावे मागितले. पण तुम्ही राजीव गांधीचेच पुत्र आहात का? यावरून आम्ही कधी पुरावे मागितले का? असा सवाल हेमंत बिस्वा सरमा यांनी केला होता. तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी केलेल्या वक्तव्यावरून देशभर संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी हे भाजपचे संस्कार आहेत का? असा सवाल पंतप्रधान मोदींना केला आहे.

Updated : 13 Feb 2022 11:49 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top