अनिल देशमुख यांना क्लिनचीट? सीबीआयचा वापर दबाव आणण्यासाठी होतोय का?
X
आज सकाळपासून माध्यमांवर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI ने क्लीन चीट दिल्याच्या बातम्या येत आहे. मुंबई चे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुली करण्याचा आरोप केला होता.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे ला 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अनिल देशमूख सीबीआय चौकशीत निर्दोष आढळल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे.
मात्र, या निमित्ताने सीबीआयचा वापर राजकारणासाठी केला जातो आहे का? या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र चे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी 'टू द पॉइंट' या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान, माजी पोलिस अधिकारी धनराज वंजारी आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांच्याशी विशेष चर्चा केली. पाहा सीबीआयचा वापर राजकारणात दबाव आणण्यासाठी केला जातोय का?