Home > Politics > #Andherieastbypoll : नोटा Vs ऋतुजा लटके सामन्यात लटके विजयी

#Andherieastbypoll : नोटा Vs ऋतुजा लटके सामन्यात लटके विजयी

#Andherieastbypoll : नोटा Vs ऋतुजा लटके सामन्यात लटके विजयी
X

मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट समजल्या जाणाऱ्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri East bypoll) पोटनिवडणूकीच्या निकालाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणूकीत एकूण सात उमेदवार होते. मात्र शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे (shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke)यांची थेट लढाई नोटाशी झाली. या निवडणूकीत ऋतुजा लटके यांचा मतांनी विजय झाला.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर रमेश लटके (Ramesh latke) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक झाली. त्यामुळे या निवडणूकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. 3 नोव्हेंबर रोजी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान झाले. या निवडणूकीत 31.74 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होती. अखेर दुपारी 2 वाजता मतमोजणी पूर्ण झाली. यामध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 इतकी मतं मिळाली तर नोटाला 12 हजार 776 इतकी मतं मिळाले. मात्र इतर सर्व अपक्षांच्या मतांची बेरीज नोटांला मिळालेल्या मतांइतकीही होऊ शकली नाही. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत ऋतूजा लटके यांचा सामना अपक्षांशी नाही तर नोटाशी झाला. मात्र यामध्ये ऋतूजा लटके यांचा मोठ्या फरकाने विजय मिळाला.

उमेदवारांना मिळालेली मतं

१. ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे) - 66247

२. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स) - 1506

३. मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी) - 888

४. नीना खेडेकर (अपक्ष) - 1511

५. फरहाना सिराज सय्यद (अपक्ष) - 1087

६. मिलिंद कांबळे (अपक्ष) - 614

७. राजेश त्रिपाठी (अपक्ष) - 1569

8) नोटा - 12776

काय आहेत अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक निकालाचे वैशिष्ट्य

  • देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच नोटा मिळालेली मतं दुसऱ्या क्रमांकावर
  • विजयी उमेदवार वगळता इतर उमेदवारांच्या मतांच्या एकूण बेरजेपेक्षा नोटांना अधिक मतं
  • अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट
  • अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीतील मिळालेला विजय हा राज्यातील सत्तांतरानंतरचा पहिलाच विजय असल्याने उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी महत्वाचा आहे.

Updated : 6 Nov 2022 2:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top