Andheri East bypoll: प्रकाश आंबेडकर यांचा पाठींबा कुणाला? अखेर केलं स्पष्ट
X
Andheri east bypoll election: शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena) च्या दोन्ही गटांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. दरम्यान शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाच्या उमेदवारी ऋतूजा लटके (Rutuja Latake) यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठींबा दिला आहे. तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Muraji patel) यांना पाठींबा जाहीर केला आहे. त्यापार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडी (vanchit bahujan Aghadi) कुणाला पाठींबा देणार? असा सवाल प्रकाश आंबेडकर (prakash Ambedkar) यांना विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (Congress, NCP, BCP support to uddhav Thackeray For Andheri east bypoll)
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्वाची आहे. मात्र आम्ही सध्यातरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. कारण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने उमेदवार दिला नाही. त्याबरोबरच इतर कोणत्याही पक्षाने उमेदवार दिला नाही. मात्र भाजप ने (BJP) उमेदवार दिला आहे. त्यामुळे आम्ही भाजपला पाठींबा देण्याचा प्रश्नच येत नाही. सध्यातरी आमच्याकडे कोणत्याही पक्षाने पाठींबा दिला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने कोणतीही भूमिका घेतली नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.