थांब तुला गडचिरोलीला पाठवतो?अंबादास दानवे असे का म्हणाले?
X
विदर्भाच्या अनुशेषवरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात मागण्या आणि पूर्तता यावर प्रदीर्घ चर्चासत्र चालले .विदर्भावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.
"शेतकऱ्यांच्या आत्महत्या,पीक विमा कंपन्यांची दादागिरी, विदर्भाचा अनुशेष भरून न निघणे यासाठी पुरोगामी महाराष्ट्रात विदर्भात देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार ,गडकरी यांसारख्या नेत्यांच नेतृत्व असताना त्यांनी भाषण करण्याऐवजी ऐवजी कृती करावी",असा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.
त्याचबरोबर विदर्भातील उद्योगधंदे, सहकार, शिक्षण ,आरोग्य यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.मेळघाट म्हणजे कुपोषण आणि कुपोषण म्हणजे मेळघाट असे वक्तव्य दानवे यांनी केले.विदर्भातील वैधानिक विकास महामंडळ पांढऱ्या हत्तीसारखे झाले आहे .जरी समृद्धी मार्ग झाला असला तरी अजून ग्रामीण भागातील रस्ते तसेच असल्याचे वास्तव त्यांनी मांडले आहे .
समृद्धी महामार्गामुळे विदर्भात विकास होईल अशी भावना असताना विदर्भाविषयीची मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे अंबादास दानवे यांनी सभागृहात जाणवून दिले आहे .कोणत्याही अधिकाऱ्याची बदली विदर्भात झाली म्हणजे त्याला शिक्षा झाल्यासारखी भावना आपण व्यक्त करतो.थांब तुला गडचिरोलीला पाठवतो ,असं आपण म्हणतो पण का? तिथे माणसं राहत नाहीत? विदर्भाविषयी एवढं वावडं बोलण्याची गरज का?ही मानसिकता आपण बदलण्याची गरज आहे ",असे परखड मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.