आयकर विभागाच्या धाडींबद्दल अजित पवार शुक्रवारी बोलणार!
X
मुंबई मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आयकर विभागाच्या धाडींबद्दल शुक्रवीग २२ ऑक्टोबरला बोलणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, " सध्य ईडीची चौकशी सुरू आहे. या आधीही अनेकदा चौकशी झाली. भाजपच सरकार असताना तर सहकार विभाग, एसीबी, सीआयडी अशा अनेक चौकशा झाल्या. महाराष्ट्रात काही फक्त जरंडेश्वर साखर कारखाना विकला गेला नाही. काही बिल्डर, शेतकरी, राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांनीही कारखाने घेतले आहेत पण त्यांच्याबद्दल बोललं जातं नाही माझ्या नातेवाईकांबद्दल मात्र बोललं जातं. आजच याबाबत पत्रकार परीषद घेणार होतो, पण आज मला काम आहेत. उद्या पत्रकार परीषद घेऊन सांगणार आहे."
याशिवाय, "माझ्याविरुद्ध गरळ ओकली गेली की मी बेईमान आहे, उभा महाराष्ट्र मला ओळखतो. मी माझ्या आयुष्यात कधीही बेईमानी केली नाही. त्या आरोपात काही तथ्य नाही, भुजबळ साहेबांची पण बदनामी केली. त्यांच्या आयुष्यातले 2 वर्ष वाया गेले." असंदेखील ते यावेळी म्हणाले.