Home > Politics > Old Pension Scheme : जुन्या पेन्शनवर अजित पवार यांची दुटप्पी भूमिका, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Old Pension Scheme : जुन्या पेन्शनवर अजित पवार यांची दुटप्पी भूमिका, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

राज्यातील 17 लाख कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यापार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रानेही जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक विचार करावा, असं म्हटलं आहे. मात्र अजित पवार यांचा अर्थमंत्री असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पहा अजित पवार काय म्हणाले या स्पेशल रिपोर्टमधून...

Old Pension Scheme : जुन्या पेन्शनवर अजित पवार यांची दुटप्पी भूमिका, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
X

राज्यातील 17 लाख कर्मचारी 14 मार्चपासून संपावर आहेत. त्यावर अजूनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्यातील जनेतेचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारने तोडगा काढण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये त्यांनी छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या पेन्शनचा उल्लेख केला आहे. त्यापार्श्वभुमीवर अजित पवार यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करता येणार नसल्याचे म्हटले होते.

राज्य सरकारचे कर्मचारी संपावर आहेत. त्यांना उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह काँग्रेस पक्षानेही पाठींबा दर्शवला आहे. त्यातच अजित पवार यांनीही या पेन्शनबाबत सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी केली आहे. मात्र अजित पवार यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अजित पवार यांनी जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नसल्याचे म्हटले होते.

जुन्या पेन्शन योजनेबाबत शिवास पाटील यांनी ट्वीट करून अजित पवार यांचा जुनी पेन्शन योजना लागू करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही हे सांगणारा व्हिडीओ ट्वीट केला आहे. (Ajit pawar viral video on old pension scheme)

अजित पवार यांनी सत्तेत असताना जुन्या पेन्शनबाबत मांडलेल्या भुमिकेवरील बातमी ट्वीट करून राजन नाईक यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

जुन्या पेन्शन योजनेबाबत (Ajit pawar on old pension scheme) अजित पवार यांनी दुटप्पी भूमिका घेतल्याची टीका आता सोशल मीडियावर केली जात आहे.

Updated : 17 March 2023 8:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top