सकाळचा शपथविधी झालाच नाही
2019 मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच शपथविधी उरकून टाकला होता. त्यामुळे अजित पवार नॉट रिचेबल झाल्यानंतर अनेक पत्रकार, राजकारणी आणि सामान्य लोकांनी रात्र जागून काढली. मात्र पहाटेचा शपथविधी झालाच नाही.
X
2019 मध्ये एकीकडे शरद पवार महाविकास आघाडीचं समीकरण जुळवत असताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी उरकला होता. त्यानंतर 80 तासात हे सरकार कोसळले. या शपथविधीवरून अनेकदा चर्चा रंगल्या. मात्र त्यानंतर आता पुन्हा त्याच प्रकारे पहाटेचा शपथविधी पहायला मिळतो की काय? असं वाटत होते. मात्र सकाळचा शपथविधीच झाला नाही, असं म्हणत मीम्सचा धुरळा उडाला आहे.
शरद पवार यांनी हिंडेनबर्गच्या मुद्द्यावर अदानींना पाठींबा दिला. त्यानंतर अजित पवार यांना आपले दिवसभराचे कार्यक्रम रद्द केले आणि कॉनवॉय सोडून खासगी वाहनाने बारामतीच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर रात्री ऊशीरा अजित पवार नॉट रिचेबल असल्याची चर्चा रंगली. त्यावरून अनेकांनी मीम्सचा पाऊस पाडला आहे.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुधीर सुर्यवंशी यांनी ट्वीट करून रात्र वैऱ्याची आहे, असं म्हटलं आहे.
Nilesh Zalte यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, ते तिकडं दौऱ्यावर गेलेत. इकडं पुन्हा पहाटेच्या शपथविधी रिटर्नसारखा माहोल बनू लागला आहे. कुछ तो बडा होनेवाला है, अपनी खुर्ची की पेटी बांध लो...
प्रवीण काळे यांनी ट्वीट करून म्हटलं की, पहाटेचा शपथविधी 2
मन्या सुर्वे नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून म्हटले आहे की, वैऱ्याची रात्र संपली का? इथं रात्रभर झोप लागू दिली नाही सूत्रांनी..पहाटेचा शपथविधी होणार हे सांगून...
पहाटेचा शपथविधी once again असं ट्वीट सौरभ केसरकर यांनी म्हटलं आहे.
अशा प्रकारे अजित पवार यांनी शुक्रवारी दुपारी आपला दौरा अर्धवट सोडल्यानंतर नॉट रिचेबल झाले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत 7 आमदार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र अजित पवार यांनी यावर खुलासा केला असला तरी अनेक राजकीय विश्लेषक, राजकारणी आणि सर्वसामान्यांनी पहाटेचा शपथविधी झालाच नसल्याचं म्हटलं आहे. त्यावरूनच प्रशांत धुमाळ यांनी खोचक ट्वीट केलं आहे.
खातेवाटपावर एकमत होत नसल्याने पहाटेचा शपथविधी पुढे ढकलला असल्याची सुत्रांची माहिती असं ट्वीट प्रशांत धुमाळ यांनी केलं आहे.
एकंदर पहाटेच्या शपथविधीकडे नजर लावून बसलेल्या सगळ्यांचाच हिरमोड झाला आहे. तर पुन्हा पहाटेचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाही हा शपथविधी झाला नाही.