शरद पवार यांचा एकेरी उल्लेख, अजित पवार यांनी भाजप आमदाराला झापले
भाजप आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी विधानसभेत बोलताना शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरून अजित पवार (Ajit pawar) यांनी राम सातपुते यांना चांगलेच झापले.
X
राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सनातन धर्मावर टीका केली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणामुळे तुम्ही येथे आहात, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यावर राम सातपुते आक्रमक झाले. त्यानंतर राम सातपुते म्हणाले, होय, मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्यामुळे आरक्षण मिळाले. मला अभिमान आहे, मी दलित असल्याचा. होय, माझ्या बापाने लोकांच्या चपला शिवल्या. मी सनातन हिंदू दलित आहे. मला आरक्षण बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाले. मला शरद पवारामुळे आरक्षण मिळाले, नसल्याचे शरद पवार म्हणाले. त्याचा अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. अजित पवार म्हणाले, सर्वच पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत बोलताना ज्येष्ठ नेत्यांचा एकेरी उल्लेख करता कामा नये. या सभागृहाची एक प्रतिष्ठा आहे ती जपली जावी, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केले. यावेळी अजित पवार यांनी राम सातपुते यांचा चांगलाच समाचार घेतला.