#Pegasus – देशात लोकशाही कुठे आहे? संजय राऊत यांचा घणाघात
टीम मॅक्स महाराष्ट्र | 29 Jan 2022 4:40 PM IST
X
X
Pegasus प्रकरणी न्यूयॉर्क टाईम्सने मोठा गौप्यस्फोट केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या इस्त्रायल दौऱ्यातच Pegasus स्पायवेअर खरेदीचा करार झाला होता, असे धक्कादायक वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने दिले आहे. यावरुन आता विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील मोदी सरकारवर हल्ला केला आहे. "या विरोधात आम्ही सातत्याने संसदेत प्रश्न विचारत आहोत. या सगळ्या विषयावर संसद चालू दिली नाही. न्यूयॉर्क टाइम्सच्या या वृत्तानंतर सत्य समोर आले आहे," अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. "आमच्यासारख्या हजारो लोकांचे फोन हे पाळतीखाली आहेत. आमच्या बँक खात्यांच्या व्यवहारांची माहिती देखील घेतली जाते. आणीबाणी पेक्षाही भयंकर परिस्थिती देशामध्ये आहे, देशात लोकशाही कुठे आहे" असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
Updated : 29 Jan 2022 4:40 PM IST
Tags: Pegasus Sanjay raut bjp shiv sena nare
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire