ठाकरे सरकारला मोठा धक्का
X
नवाब मलिक यांच्याप्रमाणेच ED चे अधिकारी शिवसेना मंत्री अनिल परब यांच्या मरीन ड्राईव्ह येथील सरकारी निवासस्थानी आणि वांद्रे येथील दाखल झाले. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीचे मंत्री असलेल्या नवाब मलिक यांच्यानंतर ED ने आपला मोर्चा परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दिशेने वळवला आहे. तर ED ने मनी लाँडरींग प्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरावर छापा टाकला. तसेच मरीन ड्राईव्ह येथील सरकारी निवासस्थानी देखील ईडीने पाहणी केली. त्याबरोबरच अनिल परब यांच्या रत्नागिरी आणि पुणे येथील संपत्तीचीही ईडीने पाहणी केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
एनआयए या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ED ने अनिल परब यांच्या पुणे, मुंबई आणि रत्नागिरी येथील सात मालमत्तांवर ईडीने छापेमारी केली. ठाकरे सरकारचे मंत्री असलेल्या अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यापाठोपाठ शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने छापे टाकल्याने अनिल परब अडचणीत आहेत. तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे सध्या तुरूंगात आहेत. त्यामुळे अनिल परब यांनाही अटक होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.