आम्हालाही आरे ला कारे करता येते, चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांना इशारा
केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान मिळाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू झाला आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 9 July 2021 11:01 AM IST
Xcourtesy social media
X
केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांना पंतप्रधान मोदींनी स्थान दिल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी राणेंवर जोरदार टीका सुरू केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या कर्तृत्वाची उंची खुप मोठी आहे आणि ती वाढत राहणार आहे, असा टोला लगावला होता. यावर संजय राऊत यांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे. राणेंच्या कर्तृत्वाची उंची जास्त असल्यानेच शिवसेनेला ते झेपलं नाही, असा टोला त्यांनी लगावला.
संजयजी राऊत काल मा. @smritiirani बद्दल जे बरळलात…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 9, 2021
मुळात आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे??
ते सांगा
मग मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत नक्की खुलासा देईन… @rautsanjay61 @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/zvGvofjChi
Updated : 23 Nov 2021 3:13 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire