Home > Politics > बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यानंतर मुलीची पहिली प्रतिक्रीया

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यानंतर मुलीची पहिली प्रतिक्रीया

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यानंतर मुलीची पहिली प्रतिक्रीया
X

पदवीधर आणि शिक्षक निवडणूकीनंतर काँग्रेसमध्ये आजी-माजी प्रदेशाध्यक्ष आमने-सामने आले आहेत. त्यातच बाळासाहेब थोरात यांनी थेट नाना पटोले यांच्याविरोधात पक्षश्रेष्टींकडे तक्रार करत विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. (Balasaheb Thorat Vs Nana patole)

पदवीधर निवडणूकीत सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राज्यात खळबळ उडाली होती. मात्र सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर तांबे यांनी आपल्या आणि थोरात कुटूंबियांना बदनाम करण्याचा कट काँग्रेसमधील काही मंडळींकडून रचला जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले. मात्र सत्यजित तांबे यांच्यापाठोपाठ बाळासाहेब थोरात यांनीही हे राजकारण व्यथित करणारे असल्याचे म्हटले. मात्र यानंतर थेट बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडला पत्र लिहून नाना पटोले यांच्या नेतृत्वात काम करणे शक्य नसल्याचे म्हटले. तर यानंतर दुसऱ्याच दिवशी बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यावर बाळासाहेब थोरात यांच्या मुलीने प्रतिक्रीया दिली आहे.

यावेळी जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांनी म्हटले आहे की, बाळासाहेब थोरात हे व्यथीत झाल्यामुळे आम्हा सर्वांना वाईट वाटत आहे. मात्र राजीनाम्यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाली नसल्याचे जयश्री थोरात यांनी सांगितले.

Updated : 7 Feb 2023 8:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top