Home > Politics > प्रवीण दरेकरांनी नैतिकता दाखवून विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा: धनंजय शिंदे

प्रवीण दरेकरांनी नैतिकता दाखवून विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा: धनंजय शिंदे

प्रवीण दरेकरांनी नैतिकता दाखवून विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा: धनंजय शिंदे
X

श्रीमंत मजूर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर उशिराने का होईना (तब्बल २३ वर्षांनी) सहकार विभागाने कारवाई करत मजूर प्रवर्गातून प्रवीण दरेकर यांची निवड मजूर नसल्याच्या मुद्द्यावर अपात्र ठरविली आहे. सहकार विभागाच्या या कारवाईचे आम आदमी पक्ष स्वागत करत आहे, परंतु केवळ इतकी कारवाई पुरेशी नसून शासन आणि सहकारी संस्थांच्या नियमांची पायमल्ली करत दिशाभूल केल्याबद्दल प्रवीण दरेकर यांना कुठल्याही सहकार संस्थेचे प्रतिनिधित्व करता येऊ नये तसेच अशा कुठल्याही संस्थेची निवडणूक लढण्यास ६ महिने बंदी घालण्यात यावी अशी आम आदमी पक्षाची प्रमुख मागणी केली आहे.

आ. प्रवीण दरेकर यांच्या मजूर असण्याच्या बद्दल चौकशी केली असता अनेक रंजक बाबी समोर येताना दिसत आहेत. सहकार विभागाने याचा तपास सुरु केला. तेव्हा प्रतिज्ञा मजूर संस्थेची कामवाटप वही सापडली. यामध्ये सभासदांच्या हजेरीची नोंद आहे. या वहीत चक्क प्रवीण दरेकर यांचे नाव आढळले आहे. दरेकर यांनी मजुरीपोटी रोख रक्कम घेतल्याची नोंद आहे. एप्रिल २०१७ मध्ये दरेकर यांनी ३० दिवस मजुरीचे काम केले. त्यांना प्रतिदिन ४५० रुपयांप्रमाणे एकूण १३५०० रुपयांचा मेहनताना मिळाला. नोव्हेंबर २०१७ मध्ये दरेकर यांनी २० दिवस मजुरीचे काम केले. त्यांना प्रतिदिन ४५० रुपयांप्रमाणे एकूण ९००० हजार रुपयांचा मोबदला मिळला. त्यानंतर दरेकर यांनी डिसेंबर २०१७ मध्ये १० दिवस मजुरीचे काम केले. या कामासाठी प्रतिदिन ३२५ रुपयांप्रमाणे एकूण ३२५० रुपयांचा मेहनताना मिळाला. ही एकूण रक्कम २५७५० रुपये इतकी आहे. त्यावर सुपरवायझरच्या सह्या आहेत.

वरिष्ठ सभागृहात विरोधी पक्षनेते असलेल्या प्रवीण दरेकर यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. पराकोटीची नैतिकता दाखवणारा भारतीय जनता पक्ष देखील मात्र सोईस्कर मौन बाळगुण आहे. प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे.

आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे या प्रकरणाचा सुरुवातीपासून पाठपुरावा करत होते. त्यांनी शासकीय स्तरावर तसेच विधान परिषद उपसभापती नीलम गोर्हे यांच्या कडे रीतसर तक्रार देखील केली होती. समाजमाध्यमवर आप कडून या प्रकरणावर सातत्याने आवाज उठविण्यात आला होता, त्याचाच परिपाक आज प्रवीण दरेकर यांचे संचालक पद रद्द होण्याने झाला आहे.

Updated : 4 Jan 2022 4:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top