पंचामृत बजेट नव्हे तर मारला पंच अन् मिळवल्या टाळ्या: 'आप' ची बजेटवर टीका
X
शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाची अपेक्षा असताना शेतकरी एक रुपया कोथिंबीर, कांदा आणि २५ पैशात वांगे विकत असताना सन्मान म्हणून शेतकऱ्यांना महिना पाचशे रुपये देणे हा खरं तर अपमानच असल्याची टीका आम आदमी पक्षाने केली आहे. पुण्यासाठी पुरंदर विमानतळ आणि रिंग रोड ला निधी किती हे स्पष्ट नाही तर इतर मेट्रो अजूनही प्रस्तावाच्या पातळीवर आहेत बजेट म्हणजे निव्वळ घोषणा असल्याची टीका आप कडून करण्यात आली आहे.
२२- २३ मध्ये शेततळ्यांसाठी शंभर कोटी निधी होता तो सुद्धा वापरला गेला नव्हता आता या वेळेस निधी वाढवलाय परंतु प्रत्यक्षामध्ये तो वापरला जाणार का हा प्रश्नच?बसेस चे रूटच कमी झाले आहेत, पगार होत नाहीत अश्या स्थितीत बस स्थानके विकासाला निधी देवून काय हशील असाही सवाल आपने उपस्थित केला आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा करणे आणि प्रत्यक्षात काही न करणे हे बजेट मधले नेहमीचे न कर्मकांड आहे.युवकांसाठी रोजगार निर्मिती साठी फारसे काही नाही. फक्त सरकारी रिक्त जागेबाबत जुन्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला आहे.अनुदान देणे थांबवून नवीन शिक्षण धोरणानुसार पाच वर्षात ८१६ नवीन पिएम्श्री शाळा कश्या होणार? असाही सवाल आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी उपस्थित केला आहे.