Home > Politics > सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत 85.31 टक्के मतदान ; 23 नोव्हेंबरला मतमोजणी

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत 85.31 टक्के मतदान ; 23 नोव्हेंबरला मतमोजणी

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत 85.31 टक्के मतदान ; 23 नोव्हेंबरला मतमोजणी
X

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज मतदान पार पडले. यात सहकार पॅनल आणि शेतकरी विकास पॅनेल यांच्यात सरळसरळ लढत होत आहे. या निवडणुकीत 85.31 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. दरम्यान निवडणुकीनंतर दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा लागल्यात त्या 23 नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजनीकडे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रणित सहकार विकास पॅनल रिंगणात आहे. या पॅनेलचे तीन उमेदवार याआधीच बिनविरोध झालेत. त्यामुळे उर्वरित गटासाठी आज मतदान पार पडले. या निवडणुकीत सहकार पॅनेलसमोर भाजपा प्रणित शेतकरी विकास पॅनल रिंगणात आहे. आज प्रत्यक्ष निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानात 85.31 इतके मतदान झाले. त्यानंतर दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी आपआपल्या विजयाचा दावा केला आहे. मात्र, काही ठिकाणी क्रॉस व्होटिंगची शक्यता नाकारता येत नसल्याने काही जागांवर धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 21 Nov 2021 7:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top