भूपेंद्र पटेल सरकारचं नव कोरं मंत्रीमंडळ, रुपाणी सरकारच्या सर्व मंत्र्यांना डच्चू
X
विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री झालेल्या भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रीमंडळात मोठे बदल करण्यात आले आहेत. गांधीनगर मधील राजभवनात राज्यपाल आचार्य देवब्रत यांनी पटेल यांच्या नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. शपथ घेणाऱ्यांमध्ये विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देणाऱ्या राजेंद्र त्रिवेदी यांचा समावेश आहे. राजेंद्र त्रिवेदी हे विधानसभा अध्यक्ष होते. त्यांचं मंत्रीमंडळात दोन नंबरचे स्थान असेल, असं बोललं जात आहे. आता निमा आचार्य या विधानसभेच्या नवीन अध्यक्ष असतील.
यावेळी 24 मंत्र्यांना एकाच वेळी शपथ देण्यात आली. आता पटेल यांच्या मंत्रीमंडळात एकूण 24 लोकांना मंत्री करण्यात आले आहे. त्यातील बहुतेक चेहरे हे नवीन असतील. विजय रुपाणी सरकारच्या जवळ जवळ सर्व मंत्र्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नवीन मंत्रिमंडळात आता 10 कॅबिनेट मंत्र्यांचा आणि 14 राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.
हे आहे भूपेंद्र पटेल यांचं मंत्रीमंडळ...
राजेंद्र त्रिवेदी, जितेंद्र वघानी, ऋषिकेश पटेल, पूर्णश मोदी, राघव पटेल, उदय सिंह चव्हाण, मोहनलाल देसाई, किरीट राणा, गणेश पटेल आणि प्रदीप परमार ला कॅबिनेट मंत्री केलं आहे.
राज्यमंत्री...
हर्ष सांघवी, जगदीश ईश्वर, बृजेश मेरजा, जीतू चौधरी, मनीषा वकील, मुकेश पटेल, निमिषा बेन, अरविंद रैयाणी, कुबेर ढिंडोर, कीर्ति वाघेला, गजेंद्र सिंह परमार, राघव मकवाणा, विनोद मरोडिया आणि देवा भाई मालव यांना राज्यमंत्री केलं आहे.
विधानसभा निवडणुकांची मंत्रीमंडळावर छाप
आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या मंत्रीमंडळ फेरबदलावर निवडणूकीची छाप दिसून येते. भाजपने जातीय समीकरण ठेवून पटेल समाजातील आठ आमदारांना मंत्री केले आहे. त्यानंतर ओबीसी समाजातून 6 आमदारांना मंत्री करण्यात आले आहे. याशिवाय जैन समाजातून एक, दोन क्षत्रिय समाजातून, दोन अनुसूचित जाती, तीन अनुसूचित जमातीतील आमदारांना मंत्री करण्यात आलं आहे.
मंत्रिमंडळाच्या निर्मितीमध्ये प्रादेशिक समतोलही राखण्यात आला आहे. संपूर्ण राज्याचे सरकारमध्ये प्रतिनिधित्व असावे म्हणून सौराष्ट्रातून मंत्री, दक्षिण गुजरातमधून 7, मध्य गुजरातमधून 6 आणि उत्तर गुजरातमधून 3 मंत्र्यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे.