Home > Politics > धमकी देऊ नका… एकच थापड दिली, तर पुन्हा उठणार नाही, उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा...

धमकी देऊ नका… एकच थापड दिली, तर पुन्हा उठणार नाही, उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा...

धमकी देऊ नका… एकच थापड दिली, तर पुन्हा उठणार नाही, उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा... Uddhav Thackeray on Prasad Lad Shivsena Bhavan Attack statement

धमकी देऊ नका… एकच थापड दिली, तर पुन्हा उठणार नाही, उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा...
X

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या कामाचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित उद्घाटन झालं.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी वेळ आली तर सेनाभवन फोडू, सेनेच्या कुंडल्या आमच्याजवळ आहेत. असं म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांचा चांगलाच समाचार घेतला. (Prasad lad Controversial statement said they will attack on Shivsena Bhavan)

"आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केलं की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता… पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ".

अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा भाजपला इशारा दिला आहे.

नक्की काय म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी? (Uddhav Thackrey on Prasad Lad on Shivsena Bhavan Attack)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांच्या भाषणाचा धागा पकडत सतेज पाटीलजी, डबल सीट म्हणाले. पण आपलं सरकार ट्रिपल सीट आहे. असं म्हणत आत्तापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केलं की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता, पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ. त्यामुळे आम्हाला थापडा मारण्याची धमकी देऊ नये. एकच थापड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसेनेचा हा लढवय्याचा गुण आहे.

अशा शब्दात प्रसाद लाड यांचा समाचार घेतला.

Updated : 1 Aug 2021 2:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top