Home > Health > ‘या’ सवयींमुळे हृदयविकाराचा झटका टळू शकतो!

‘या’ सवयींमुळे हृदयविकाराचा झटका टळू शकतो!

धावपळीच्या लाईफ स्टाईलमुळे तरुणानांना स्वत:साठी वेळ देता येत नाही. घरातून कामावर आणि कामावरून थेट घरी येवढच काय ते त्यांच विश्व बनलेलं असत. त्याही पेक्षा पोष्टीक खाण्या ऐवजी ऑईली खाण्यावर लोक जास्त भर देत आहेत. परंतु ही तुमची सवय असेल तर सावध राहा!

‘या’ सवयींमुळे हृदयविकाराचा झटका टळू शकतो!
X

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ओढवणाऱ्या तरुणांचं प्रमाण हल्ली खूप वाढ आहे. यासाठी तरुण वयातच काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. काही सवयी आपण टाळल्या आणि काही चांगल्या सवयी लावून घेतल्या तर कदाचित हा धोका कमी होऊ शकतो.

पूर्वी तरुणवयात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता क्वचीत होती. परंतू आता लाईफ स्टाईल, वर्क कल्चर, वर्क लोड यामुळे हे प्रमाण वाढत असल्याने. हल्ली हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू व्हायचं प्रमाण देखील वाढत असल्याचं समोर आलं आहे. आपण काही सवयीमध्ये सुधारणा केली काही गोष्टी टाळल्या तर आपलं आरोग्य हे चांगलं राहू शकतं.

हृदयाची काळजी घेण्यासाठी ताजे पदार्थ खा.

निरोगी आयुष्यासाठी, निरोगी हृदयासाठी हेल्दी फूड खूप गरजेचं आहे. हृदयविकारापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर जंक फूड खाणं सोडा, पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, साखर, रेड मीट आणि तळलेल्या गोष्टी खाऊ नका. तर हृदयाची काळजी घेण्यासाठी ताजी फळे, भाज्या, मासे यासारखे पदार्थ खायला हवे.

अनावश्यक विचार टाळा

हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका टाळायचा असेल तर नातेसंबंधातील टेन्शन, कामातील टेन्शन, जीवनातील धकधक थांबवा. याने तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अनावश्यक विचार टाळा. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करू नका. आनंदी राहायची सवय लावा.

व्यायामासाठी वेळ काढा

आपण कितीही बिझी असलो तरी व्यायामासाठी वेळ काढायला हवा. एका जागी ८-१० तास बसून काम केल्यानं हार्ट अटॅकचा धोका वाढतो. व्यायामासाठी वेळ काढायला हवा. त्यासाठी वेळ नसेल तर चालायला हवं. चालणे हा देखील उत्तम व्यायाम आहे.

वाईट सवयींपासून दुर रहा

सिगारेट, मद्यपान केल्याने हृदयाचे आरोग्य बिघडते. या वाईट सवयींपासून दुर राहा. जर सवयी असतील तर त्यातून जितक्या लवकर तुम्ही स्वतःची सुटका करून घ्याल तितकं चांगलं. अशा प्रकारची व्यसनं तुम्हाला असतील तर तुम्ही हृदयविकाराला बळी पडू शकता.

Updated : 12 Oct 2023 6:07 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top