कराल जॉगिंग तर राहाल नक्कीच निरोगी
X
सध्याच्या धकाधकीच्या जिवनात आपला बराच वेळ हा प्रवासात आणि काम करण्यात जातो . त्यामुळेच आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते . मात्र तुम्हाला माहीत आहे का फक्त १० मिनिटे जॉगिंग केल्याने आपले आरोग्य निरोगी राहू शकते .
वर्तमानात याचे काही परिणाम जाणवत नसले तरी भविष्यात खूप वाईट परिणाम दिसून येतात. त्यामुळे तुम्हाला वेळीच सतर्क राहणे आवश्यक आहे.
सकाळी जॉगिंग केल्याने आपले शरीर निरोगी तर राहतेच मात्र शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत ही होते . दररोज 30 मिनिटे धावल्यास श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून दूर राहता येईल.तसेच तुमचे फुफ्फुस दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत होईल. धावण्याने आपली फुफ्फुसे चांगली कार्य करतात. तसेच शरीरातील ऑक्सिजनची प्रक्रिया सुधारते.उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या किंवा बीपी नियंत्रणात नसलेल्या व्यक्तींनी रोज धावायला हवे. दररोज धावणे मानसिक आरोग्य सुधारते तसेच थकवा आणि तणाव कमी करून मूड सुधारते. यामुळे तुम्हाला आराम वाटतो आणि रात्री लवकर झोप येते. यामुळे तुम्हाला चांगल्या दर्जाची झोप मिळते. नियमित धावल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा इत्यादीसारख्या हृदयविकाराच्या जोखीम घटकांमध्ये सुधारणा करण्यास मदत करते. यासोबतच हृदयविकाराचा झटका, हार्ट फेलियर आणि स्ट्रोकपासून तुमचे संरक्षण होते. १० मिनिटाच्या जॉगिंगमुळे तुमचे जीवन निरोगी राहू शकते .