Eye Flu | राज्यात डोळ्यांची साथ ; विभागाकडून पथके तैनात-आरोग्यमंत्र्यांची माहिती
X
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यात डोळे { Eye Flu } येण्याची साथ वाढली आहे. डोळ्याच्या संसर्गाची साथ फोफावली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत २ लाख ४८ हजार ८५१ डोळे संसर्गाचे रुग्ण आढळून आले आहे. मुबंई, पुणे, ठाणे चंद्रपूर या जिल्ह्यात डोळ्याच्या संसर्गाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. आरोग्य विभागाची पथके तैनात करण्यात आली असल्याचं माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
राज्यात डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून मुंबई, पुणे, ठाणे चंद्रपूर, गडचिरोली येथे रुग्ण संख्या जास्त प्रमाणात आढळून आल्याने आरोग्य विभागाची पथके तैनात करण्यात आली आहेत. डोळ्याबरोबर मलेरिया, चिकन गुणियाचेही रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य विभागाची पथके तैनात केल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले कि, राज्यात डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात असून मुंबई, पुणे, ठाणे चंद्रपूर, गडचिरोली येथे रुग्ण संख्या जास्त असून काळजीपोटी आरोग्य विभागाने पथके तैनात केली आहेत. शाळेतील मुलं असतील किंवा वयस्कर लोक यांची काळजी घेतली जात असून जास्त फैलाव होणार नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे.