Home > Health > कोरोनाची तीव्रता कशी ओळखाल? डॅा. संग्राम पाटील

कोरोनाची तीव्रता कशी ओळखाल? डॅा. संग्राम पाटील

कोरोना झाल्यास तात्काळ हाॅस्पिटलमध्ये भरती होणे गरजेचं आहे का? कोरोनाची लक्षणं नसताना नक्की काय करावं? कोरोनाची तीव्रता कशी समजून घ्यावी. पाहा संग्राम पाटील यांचे विश्लेषण

कोरोनाची तीव्रता कशी ओळखाल? डॅा. संग्राम पाटील
X

राज्यात दररोज कोरोनाचे जवळपास ३० ते ३५ हजार रूग्ण आढळत आहेत. जगभरात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे. सातत्याने रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ गंभीर असली तरी अनेक लोकांमध्ये कोरोनाची लक्षणही आढळत नाही. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झालेली असते. तर काही रूग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षण आढळतात. त्यामुळं कोरोनाची लक्षणं समजून घेणं गरजेचं ठरते.

कोरोनाच्या तीव्रतेनुसार कोरोना रुग्णावर इलाज केला जातो. कोरोना झाल्यानंतर काही लोक लगेच घाबरून जातात. त्यामुळे कोरोना झाला तरी कोरोनाची तीव्रता माहित असल्यास तुम्हाला योग्य वेळी नक्की काय करायचे हे समजते.

कोरोना संक्रमणाची लक्षण पाहून तुम्ही रुग्णालयात भरती व्हायचं की नाही? हे तुम्ही ठरवू शकता.

लक्षणविरहित कोरोनासाठी काय केलं पाहिजे? तुम्हाला झालेल्या संक्रमणाची तीव्रता किती? हे समजून घेणं गरजेचं ठरते. त्यासाठी प्रसिद्ध डॉ. संग्राम पाटील यांच्याशी मॅक्समहाराष्ट्रने बातचीत केली.

कोविड विषाणूच्या तीव्रतेनुसार रूग्णांचे वर्गीकरण केले जाते...

असिस्टमॅटिक

माईल्ड

मोडरेट

सिवियर आणि क्रिटिकल

या वर्गीकरणानुसार रूग्णांनी योग्य वेळी न घाबरता इलाज करायला हवा. त्यामुळं कोरोना रूग्णांचे लक्षण समजून घेणं गरजेचं ठरते.

नक्की काय आहेत लक्षणे पाहा डाॅ. संग्राम पाटील यांचे विश्लेषण..

Updated : 26 March 2021 8:58 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top