Home > Entertainment > रमाईच्या भूमिकेने बाबासाहेब उमगले: सोनाली कुलकर्णी

रमाईच्या भूमिकेने बाबासाहेब उमगले: सोनाली कुलकर्णी

रमाईच्या भूमिकेने बाबासाहेब उमगले: सोनाली कुलकर्णी
X

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मॅक्समहाराष्ट्र वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधत आहे. देशात आणि जगात नावलौकिक मिळवणाऱ्या अनेक व्यक्तींच्या जीवनातील यशामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा आहे. याच विचारांचा वसा घेऊन चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्याशी आम्ही बातचीत केली.
त्या म्हणतात…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीलाच नव्हे तर त्यांच्या विचारधारेला माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे . मी डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. आंबेडकर या चित्रपटात रमा आंबेडकरांची भूमिका साकारली होती. माझ्या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर मला हा सिनेमा मिळाला होता. ज्यामुळे माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विस्तारला. मी आज अभिमानाने सांगू शकते की 'मानवता' सोडून कुठल्याही धर्मावर विश्वास नाही. आणि त्याच संपूर्ण श्रेय डॉ. आंबेडकर आणि त्यांचे कुटूंब ज्यांनी अनेक कष्ठांना यातनांना सामोरे गेले आहेत. त्याला समर्पित आहे. नव्या पिढीला आपल्या समाजाची ओळख करुन देण्याचा व्रत आणि ध्येय डॉ. जब्बार पटेल यांनी हाती घेतलं आहे. असं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सांगितलं.

Updated : 14 April 2021 3:01 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top