सावित्रीज्योती फेम अश्विनी कासारचं पहिलं love song "सखे गं"
नुकतचं अश्विनी कासार हिने सोशल मीडिया वर पोस्ट शेअर करत तिच पहिलं प्रेमगीत ( love song ) लवकरच रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितलं आहे, आता valentine week सुरु होणार आहे. 'Valentine's Day' week ला म्हणजे 7 फेब्रुवारीला अश्वघोष थिएटर निर्मित "सखे ग" अतिशय सूंदर रोमांचक गीत अश्वघोष मराठी युट्युब या प्लॅटफॉर्म पाहायला मिळणार आहे.
X
नुकतचं अश्विनी कासार हिने सोशल मीडिया वर पोस्ट शेअर करत तिच पहिल प्रेमगीत ( love song ) लवकरच रसिकांच्या भेटीला येणार असं सांगितलं आहे. आता valentine week सुरु होणार आहे. 'Valentine's Day' week ला म्हणजे 7 फेब्रुवारीला अश्वघोष थिएटर निर्मित "सखे ग" अतिशय सूंदर रोमांचक गीत अश्वघोष मराठी युट्युब या प्लॅटफॉर्म पाहायला मिळणार आहे.

"सखे गं" हे गाणं तिच पहिल मराठी love song असून या गाण्यातून चळवळीतल प्रेम कश्या पद्धतीने असावं. आणि चळवळीतल्या निखा-यावर असंही प्रेम होऊ शकत याच उत्तम उदाहरण या गाण्यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत "मी खूप excited आहे. तुम्ही माझं हे गाणं please, please , please नक्की बघा" अस चाहत्यांना सांगितलं.
या गाण्यात अश्विनी कासार सह मुख्य भूमिका साकारणार्या गाण्याचे गायक आणि अभिनेते संघरात्न झेंडे पाहायला मिळणार आहेत. अश्विनी कासार आणि संघरात्न झेंडे या दोघांच पाहिलं love song आहे.
खरंतर कायद्याचं शिक्षण घेऊन अभिनेत्री बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास फार रंजक आहे. त्यात सावित्रीज्योती मालिकेत मुख्य भूमिका साकारताना समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तिचा वेगळा झाला. चळवळीतल गाणं आहे असं ऐकताच काहीही मागचा पुढचा विचार न करता तिने होणार दिला. अभिनेत्री म्हणून अगदीच यशस्वी रित्या ते काम तिने पूर्ण करून दाखवले. "सखे ग" या गाण्यात निर्माता राजेंद्र नारायण झेंडे, कार्यकारी निर्मात्या मनीषा भामरे,आहेत तर गीतकार बबन सरवदे, दिग्दर्शक रोहित डावरे, छायाचित्रण अशोक सालियन, गायक संघरत्न झेंडे, नृत्यदिग्दर्शन दिलीप मिस्त्री, क्रिएटिव्ह दिग्दर्शक करण राज, निर्मिती प्रमुख करण माळवे, यांनी केले असून एडिटर प्रतुल गायकवाड, संगीत दिग्दर्शक राहुल घागरे, संगीत संयोजक अद्वैत कोल्हटकर, रेकॉर्डिंग आणि मिक्सिंग (फिनिक्स स्टुडिओ) प्रतिक वाघ (२४ फ्रेम्स स्टुडिओ) मेघनाथ श्रीधर लबडे,हे सर्व चळवळीतल्या अनोख्या love song मधे सहभागी आहेत.
मराठी टेलिव्हिजन फेम आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अश्विनी कासार हिने "कमला" या सिरीयल मध्ये अभिनय केला. नंतर तिची चर्चा सर्वत्र पसरली आहे. विजय तेंडुलकर यांच्या कादंबरीवर आधारित असलेली कमला ही मालिका प्रचंड गाजली होती. अश्विनीची ही पहिलीच मालिका असली तरी प्रेक्षकांनी या मालिकेतील तिची भूमिका डोक्यावर घेतली होती. आज ही मालिका संपून अनेक वर्षे झाली तरी प्रेक्षक तिला कमला म्हणून ओळखतात.
आता पर्यंत तिने अनेक मराठी हिंदी मालिका, नाटक, आणि चित्रपटांमध्ये अभिनय केला. 'सुख म्हणजे नक्की काय असत" या मालिकेत तिने मानसी नावाची निगेटिव्ह भूमिका साकारली होती. चाहत्यांना तिला निगेटिव्ह रूपात पाहणं अतिशय मनोरंजनात्मक वाटलं होतं. सोनी मराठीची मालिका "सावित्री ज्योती" या मालिकेत सावित्रीबाई फुलेची मुख्य भूमिका साकारत होती. स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी अवहेलना झेलून काम करणाऱ्या फुले दांपत्याच्या कामावर आधारित ही मालिका होती.
आश्विनीने "एक होतं माळीण" या चित्रपटात ही प्रमुख भूमिका साकारली होती. अश्विनीने 'ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार' आणि 'बायको' या शॉर्ट फिल्ममध्ये ही काम केले होते. यासोबतच तिने, गर्जा महाराष्ट्र एपिसोडिक शोमध्ये देखील अनेक भूमिका साकारल्या होत्या. 'सोयरे सकळ' या व्यावसायिक नाटकातही तिने काम केले होते. आश्विनीने "एक होतं माळीण" या चित्रपटात ही प्रमुख भूमिका साकारली होती अभिनय क्षेत्रात तिने तिचे पाय रोवले आहेत.पण "सखे ग" या गाण्याच्या माध्यमातून तिच चळवळीतल प्रेम आणि वेगळ रूप चाहत्यांना पाहायला मिळणार आहे हे मात्र नक्की.