Home > Entertainment > मुशायरा : मराठी, उर्दू शायरीचा संगम

मुशायरा : मराठी, उर्दू शायरीचा संगम

जातो तिथे उपदेश आम्हा सांगतो कोणीतरी कीर्तने सारीकडे चोहीकडे ज्ञानेश्वरी, काळजी आमुच्या हिताची एवढी वाहू नका जाऊ सुखे नरकात आम्ही तेथे तरी येऊ नका... - भाऊसाहेब पाटणकर

मुशायरा : मराठी, उर्दू शायरीचा संगम
X

रमजान ईद च्या निमित्ताने "मराठी, उर्दू शायरीचा संगम आपल्याला या कार्यक्रमातून दिसून आला.

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान " चावडी" आयोजित मराठी उर्दू मुशायरा असा अनोखा कार्यक्रम रविवारी दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता, नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका पांच पाखाडी, ठाणे ( पु )येथे पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ओबेद आझम आझमी होते. तर डॉ. दिलीप पांढरपट्टे 'रिन्द' हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक होते. या कार्यक्रमाला ए. के. शेख, डॉ. मिलिंद वाटवे, डॉ. रफिया शबनम अबिदी, तर संदीप माळवी, शबाना मुल्ला, मृद्गंधा दीक्षित, साहिल कबीर आणि किशोर कदम 'सौमित्र' हे मान्यवर लाभले होते.



Updated : 28 April 2023 3:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top