A. R. Rahman ए.आर. रहेमान ने लग्नासाठी ठेवल्या या तीन अटी, चला तर जाणुन घ्या काय आहेत त्या अटी ?
X
जागतीक कीर्तीचे संगीतकार ए.आर .रहेमान (A.R.Rehman)हे भारतातील असे कलाकार आहे ज्यांनी पुर्ण जगात आपल नाव कमवल आहे. जगभरात आपल्या मधुर आवाजाने लोकांचे मन जिंकणारा प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहेमान यांचा आज वाढदिवस आहे. ए.आर.रहमानचे खरे नाव दिलीप कुमार असून ते ए. आर. रहमान या नावाने जगभर ओळखले जातात. जो त्याच्यासाठी अनेक प्रसंगी चर्चेचा विषयही ठरला आहे. आपल्या संगीताने लोकांच्या हृदयात सामावलेले रहमानला संगीताचा वारसा वडिलांकडूनच मिळाला आहे. त्यांचे वडील तदेखील संगीतकार होते.
रहमानचे जीवन चढ-उतारांनी भरलेले आहे, परंतु त्याचे प्रेमजीवन हे खूपच मनोरंजक आहे. ते त्यांच्या पत्नी सायरा बानो यांच्यावर अतोनात प्रेम करतात. पण त्यांनी सायरा बानो यांच्याशी लग्न करण्याआधी आपल्या आईला तीन अटींवर कायम राहणारी मुलगी शोधण्यास सांगितले. त्यांची पहीली अट होती ते शिक्षित असावी कारण ए. आर. रहमान हे फक्त पदवीदर (graduation) होते. दुसरी म्हणजे तीला संगीताची आवड असावी आणि तीसरी ती दिसण्यास खुप सुंदर असावी. रहमानच्या आईला या सर्व गुणांनी भरलेली मुलगी शोधणे खूप अवघड होते, कारण तिन्ही गुण एकीत सापडणे सोपे नव्हते. बराच मुली शोधल्यानंतर रहिमान ची आई एके दिवशी आपल्या नातेवाईकांनसह चेन्नईतील (Chennai) एका बिजनेसमॅन च्या घरी गेली त्यांना दोन मुली होत्या. एक मेहर आणि सायरा असे त्याचे नाव होते. ते खंरतर त्यांच्या लहान मुलीला बघायला गेले होते पण याला योगायोग म्हणा किंवा नशिबाचा खेळ रहिमान च्या आईला ते संपुर्ण गुण त्याची मोठी मुली सायरा बानोत दिसले. मग तर काय त्यांनी लगेच सायरा च्या वडीलांना सायरा हात मागितला.
साल 1995 मध्ये ए.आर. रहमान आणि सायरा हे लग्नाच्या पवित्र बंधनात बंधले. लग्नाच्या वेळी रहिमान 27 तर सायरा 21 वर्षाच्या होत्या. ए .आर. रहमानने भारतीय चित्रपटसृष्टीत संगीताला नव्या उंचीवर नेले आहे. ए आर रहमान यांना आपल्या करियर मध्ये एकदा ऑस्कर अवॉर्ड (Oscar Award),चार राष्ट्रीय फिल्म अवॉर्ड, दोन अकेडमी अवॉर्ड, दोन ग्रैमी अवॉर्ड (Grammy Award)एक बाफ्टा अवॉर्ड आणि गोल्डन ग्लोब अवॉर्ड ने सन्मानित केल आहे. ए आर रहिमान यांचा चेन्नई मध्ये स्वतःचा म्युझिक स्टुडिओ देखील आहे.