ह्रतिक रोशन पुन्हा चढणार बोहल्यावर...
X
बॉलिवूडचा हँडसम हिरो ह्रतिक रोशन वयाच्या ४९ व्या वर्षी बोहल्यावर चढणार आहे. आज ह्रितक रोशन आपला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. ह्रतिक रोशन आपल्या आगामी चित्रपट 'फायटर' साठी दीपिका पादुकोणसोबत शुटींगला सुरवात करणार आहे. यावर्षी ह्रतिक रोशन आपली नवी गर्लफ्रेंड सबा आझादशी लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. ह्रतिक रोशनचे कुटुंबही सबाबाबत खूप आनंदी आहे. रोशन कुटुंबियांना वाटते की, सबा ही ह्रतिकसाठी परफेक्ट आहे.
ह्रतिक रोशन आणि सबा आझाद हे अनेक ठिकाणी एकत्र दिसून आले आहेत. कधी पार्टीमध्ये तर कधी दोघेही सुट्टीचा आनंद घेताना दिसून आले आहेत. दोघांच्याही चाहत्यांना ह्रतिक आणि सबाची जोडी आवडू लागली आहे. सबा आणि ह्रतिकच्या या नव्या नात्याबद्दल रोशन कुटुंबीय आनंदी आहेत. इतकंच नाही तर ह्रतिकची एक्स पत्नी सुजैन खान आणि मुलांसोबतही सबाचं चांगलं बॉन्डिग पाहायला मिळत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार दोघांच्या नातेवाईकांना हे नात मंजूर आहे. त्यानुसार आता ह्रतिक आणि सबा यांनी आपल्या लग्नाच्या प्लॅनिंगला सुरवात केली आहे. या वर्षाच्या अखेरीस दोघेही लग्न करतील अशी त्यांच्या फॅन्सना आशा आहे. सध्या दोघेही आपल्या कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहेत. ह्रितक आणि सबा यांचे लग्न भव्यदिव्य असणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. सुझान खानसह फक्त काही जवळचे नातेवाईक आणि मित्र या लग्नाला हजर असतील, अशी सुत्रांची माहिती आहे.
ह्रतिक रोशन आजही त्याची एक्स पत्नी सुझैनसोबत चांगले संबंध ठेवून आहे. दोघेही अनेकदा त्यांच्या मुलांसोबत एकत्र फिरताना स्पॉट झालेले आहेत. सुझान सध्या अर्सलान गोनीला डेट करत आहे. दोघेही अनेकदा त्यांचे फोटो शेअर करतात आणि पार्टीमध्ये एकत्र दिसून येतात.