Bigg Boss 17 Winner : मुनव्वर फारुकी विजेता
X
Bigg Boss 17 Winner - बिग बॉस या रिॲलिटी शोच्या 17 व्या सीझनचा विजेता मुनव्वर फारुकीला (Munawar Faruqui) विजेता घोषित करण्यात आला. मुनव्वर याने इंस्टाग्रामवर 61 लाख चाहत्यांसह सुरुवात केली होती आणि सध्या त्याचे 1.13 कोटी चाहते असलेल्या 50 लाखांहून अधिक रक्कम आणि ह्युंदाई क्रेटा कारसह ट्रॉफी आपल्या घरी घेऊन गेला.
बिग बॉसच्या घरामध्ये 105 दिवस घालवले आहेत, जे सर्वाधिक कठीण मानले जाते. मुन्नावरने अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), मन्नारा चोप्रा (Mannara Chopra), अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि अरुण महाशेट्टीसह (Arun Mahashetti) इतर चार शीर्ष स्पर्धकांसह स्थान कायम ठेवले होते. सलमाननेही (Salaman Khan) अभिषेकचे अभिनंदन केले आणि तो खरोखरच चांगला खेळ खेळला असल्याचं सांगितले.
बिग बॉसच्या घरात मुनव्वरला बादशाह, रफ्तार, एमिवे बांटाई, गणोश आचार्य, करण कुंद्रा, एमसी स्टेन आणि प्रिन्स नरुला यांसारख्या अनेक सेलिब्रिटी मित्रांकडून मोठा पाठिंबा मिळाला. टॉप 5 स्पर्धक देखील लोकप्रिय बॉलीवूड ट्रॅकवर परफॉर्म करताना ते दिसले.
'कभी खुशी कभी गम' मध्ये पती विकी जैनसोबत अंकिताने परफॉर्म केला. अभिषेक कबीर सिंग चित्रपटातील बेखयालीवर परफॉर्म करताना दिसला होता, अरुणने त्याचा चांगला मित्र आणि माजी स्पर्धकासोबत डान्स केला होता. मन्नाराने बेशरम रंग या गाण्यावर आपली जादू पसरवली. त्यानंतर मुनव्वरने मन्नारासोबत ट्विस्टवर डान्स केला.
अजय देवगण (Ajay devgan), आर. माधवन (R.Madhavan), भारती सिंग(bharati sing), कृष्णा अभिषेक(Krishna Abhishek), सुदेश लाहिरी (Sudesh Lahiri), ओरी, अब्दू रोजकी (Abdul Rojki), सुनील शेट्टी (Sunil Shetti), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit Nene), अरबाज खान (Arbaj Khan), सोहेल खान(Sohel Khan) यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी बिग बॉस या रिॲलिटी शोच्या 17 सीझनच्या ग्रँड फिनालेला हजेरी लावली होती.