बिग बॉस १३ चा विजेता सिध्दार्थ शुक्ला याचे निधन,
टीम मॅक्स महाराष्ट्र | 2 Sept 2021 1:25 PM IST
X
X
हिंदी मालिका क्षेत्रातील अतिशय लोकप्रिय अभिनेता सिध्दार्थ शुक्ला याचे गुरूवारी निधन झाले आहे. त्याचं निधन हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली आहे. विशेष म्हणजे मृत्युसमयी त्याचं वय फक्त ४० होतं. त्याच्या निधनाचं वृत्त कळताच सर्वांनाच सर्वांनाच धक्का बसला आहे. मालिकाक्षेत्रातील तसेच सिनेसृष्टीतील कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसोबत कलाकार देखील पोस्टद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहेत. सिध्दार्थने मॉडेल म्हणून कलाक्षेत्रात पदार्पण केले होते. 'बालिका वधू' या मालिकेतील अभिनयाने त्याने अनेकांची मने जिंकली होती. त्यानंतर त्याने बिग बॉस १३ , खतरों के खिलाडी यासारख्या शोजमध्ये सहभाग घेतला होता. बिग बॉस १३ चा तो विजेतादेखील राहिला आहे.
Updated : 2 Sept 2021 1:25 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire